दुःखद वार्ता
अकोला : तालुक्यातील वखापुर येथील मूळचे व सध्या जुने शहर डाबकी रोडवरील नंदाने मंगल कार्यालयाजवळ वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित नागरिक, दैनिक
अजिंक्य भारतचे मुद्रित शोधक तसेच संभाजी ब्रिगेडचे सक्रिय पदाधिकारी संतोष तुकाराम गायगोळे (५२) यांचे गुरुवारी, दिनांक २१ ऑगस्ट रोजी सकाळी
१० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन बहिणी असा आप्त परिवार आहे.
गायगोळे यांचे पार्थिवाचे अंत्यसंस्कार शुक्रवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता जुने शहरातील गुलजारपुरा मोक्षधाम येथे करण्यात येणार आहे.
सर्वांच्या मनात हसतमुख, प्रेमळ व मदतीला तत्पर अशी ओळख निर्माण करणाऱ्या संतोष गायगोळे यांच्या अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/bharavar-turif-invert/
