डाबकी रोड वाशी यांची 105 फूट लांब कावड

डाबकी रोड वाशी यांची 105 फूट लांब कावड

डाबकी रोड वाशी यांची 105 फूट लांब कावड

शिवभक्तांचा श्रद्धा आणि भक्तीचा जल्लोष

: श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार… आणि अकोल्याच्या राजेश्वर देवाच्या जलाभिषेकाची परंपरा! तब्बल सात दशकांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे.

अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राज राजेश्वर देवाला जल अर्पण करण्यासाठी हजारो भाविक १७ किलोमीटर

अंतरावरील पूर्णा नदीकडे पायी जातात..अकोला शहरातील सर्वात मोठी डाबकी रोडची महाकाय कावड यंदाही जल आणण्यासाठी निघाली आहे.

तब्बल १०५ फूट लांबीची २१०० भरण्यांची ही कावड… आणि यात सुमारे ३००० युवकांचा उत्साही सहभाग पाहायला मिळत आहे.

श्रद्धा, भक्ती आणि जल्लोषाचा संगम झालेली ही कावड यात्रा शहरभर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.