अकोला : डाबकी रोडवरील रमेश नगरात पोलिसांची धडक कारवाई! १० जण तीन पत्ती जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
छाप्यातून ₹६४,६५० चा मुद्देमाल जप्त, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल. पुढील तपास पोलिसांकडून सुरू
अकोला : शहरातील डाबकी रोड परिसरात पोलिसांनी कारवाई करत १० जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
रमेश नगरातील संजय उंटवाल यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत ५२ पत्त्यांवर आधारित तीन पत्ती जुगार खेळला
जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. छाप्यात ₹६४,६५० रुपयांचा रोकड व जुगार साहित्य
जप्त करण्यात आले.या प्रकरणात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/pen/