महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल व बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ‘Cyber Sakhi’ कार्यक्रम संपन्न

Cyber Sakhi

बुलढाणा : डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन फसवणुकीपासून समाजाला जागरूक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल आणि बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Cyber Sakhi – Digital Safety Awareness’ हा उपक्रम उत्साहात सुरू करण्यात आला. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात महिला फार्मासिस्ट मोठ्या संख्येने सहभागी झाल्या.

महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिलच्या औषध माहिती केंद्राच्या (Drug Information Centre) वतीने हा उपक्रम राबविण्यात आला असून, डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी महिला फार्मासिस्ट ‘Cyber Sakhi’ म्हणून पुढे येणार आहेत. हा उपक्रम आप्पासाहेब शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि कौन्सिलचे अध्यक्ष अतुल अहीरे व सर्व सभासदांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित महिला फार्मासिस्ट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Related News

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात औषध माहिती केंद्राचे (DIC) प्रमुख गणेश बंगळे यांनी ‘Cyber Sakhi’ या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. डिजिटल माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढत असताना सायबर गुन्हे, फेक हेल्थ माहिती, ऑनलाइन आर्थिक फसवणूक अशा समस्याही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत समाजाला डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी महिला फार्मासिस्ट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी परिषदेच्या कार्यकारिणी सदस्या सोनाली पडोळे यांनी ‘Cyber Sakhi’सारख्या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना महिला फार्मासिस्ट समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी सक्षम असल्याचे मत व्यक्त केले.

परिषदेच्या रजिस्ट्रार सायली मसाळ यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. आपल्या भाषणात त्यांनी मानवतेचे आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले.

बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष गजानन शिंदे यांनी महिला दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. बुलढाणा जिल्हा महिला सक्षमीकरणासाठी कायमच अग्रेसर राहील आणि अशा सामाजिक उपक्रमांना नेहमी पाठिंबा देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना अनिल भाऊ नावंदर यांनी फार्मासिस्ट हे समाजातील विश्वासार्ह आरोग्य मार्गदर्शक असल्याचे सांगितले. ‘Cyber Sakhi’ या संकल्पनेद्वारे महिला फार्मासिस्ट डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करतील, फेक माहितीची पडताळणी करतील तसेच सुरक्षित ऑनलाइन व्यवहारासाठी नागरिकांना मार्गदर्शन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटन समारंभानंतर आयोजित प्रशिक्षण सत्रात सायबर सुरक्षिततेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रात डॉ. विनया कुलकर्णी यांनी सायबर सुरक्षिततेची मूलतत्त्वे, OTP फसवणूक टाळण्याचे उपाय, फेक लिंक कशी ओळखावी तसेच सोशल मीडियावर पसरविण्यात येणारी चुकीची आरोग्य माहिती कशी पडताळावी याबाबत सखोल माहिती दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील महिला फार्मासिस्ट डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृतीचे नेतृत्व करतील आणि समाजात सुरक्षित डिजिटल व्यवहाराची संस्कृती निर्माण करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने पार पडले असून, महिला फार्मासिस्टनी ‘Cyber Sakhi’ या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत केले. डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरेल, असा आशावादही यावेळी व्यक्त करण्यात आला.

read also :  https://ajinkyabharat.com/consequences-of-the-war-on-the-internet-and-the-possibility-of-an-internet-crisis-in-india-due-to-increased-maritime-tension/

Related News