देवानंद खिरकर
अकोट येथील श्री.अंबिका अर्बन मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी चिखली शाखा अकोट येथे ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक तथा अकोट शाखा समिती अध्यक्ष मा.लूणकरण डागा प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शुकदास गाडेकर दादा (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम पाटसूल)प्रमुख उपस्थिती गोपाल मोहोड (तालुका अध्यक्ष भाजपा अकोट)स्थानिक सल्लागार प्रमोद चांडक,संजय धाके,प्रा.दीपक जोत सर,राजेश लखोटीया,याची उपस्थिती लाभली.अकोट शाखेचे शाखाधिकारी राहुल शेंडे यांनी संस्थे विषयी सविस्तर माहिती विशद केली.त्यांनी सांगितले की संस्थेच्या अध्यक्षा डॉ.संध्या कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी संस्थेच्या ठेवी मध्ये निरंतर वाढ झाली असून शाखेत आरटीजीएस,सोनेतारण कर्ज,तसेच दैनंदिन परतफेड कर्ज आदी योजना राबवल्या जातात.संस्था नेहमी ग्राहकांच्या हिताचा विचार करत असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये प्रा.जोत सर यांनी अंबिका अर्बनचे सभासद ठेवीदार यांना संस्थे बदल माहिती दिली.प्रमोद चांडक यांनी सुद्धा अंबिका अर्बनचा वाढता विश्वास त्या बद्दल सभासदांचे आभार मांडले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शुकदास गाडेकर महाराज यांनी स्वतः ते अंबिकाशी सभासद ठेवीदार या नात्याने संस्थेचे व्याज दर सुविधा या बद्दल त्याच्या प्रबोधनातून समाधान व्यक्त केले.कार्यक्रमासाठी शाखाधिकारी राहुल शेंडे,कर्मचारी केशव कोल्हे,गजानन गावंडे,शाखा येवदा शाखाधिकारी निखिल लंके,अमीत भुलगावकर,वृषीकेश जोध,आकाश बोचे,तसेच संस्थेचे सभासद,डॉक्टरवकील,शिक्षक मंडळी,व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थिती होती.प्रचंड उत्साहात वैचारिक मंथन व ग्राहक मेळावा संपन्न झाला.
read also : https://ajinkyabharat.com/uike-kutumbiakadun-chief-minister/