क्राइम थ्रिलर : 28 लाख खर्च करून पत्नीला कॅनडाला पाठवले, वर्क परमिट मिळताच नातं तुटलं; व्यथित पतीने संपवलं आयुष्य

चंदिगढ / पंजाब : उच्च शिक्षणासाठी कुटुंबाच्या पैशावर कॅनडाला पाठवलेल्या

पत्नीने काही दिवसातच पतीशी नातं तोडल्याने

पंजाबमधील एक तरुण आत्महत्या करुन आपले जीवन संपवले.

ही घटना कपूरथला जिल्ह्यातील बेगोवालमध्ये उघडकीस आली आहे.

तरुणाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पत्नी तसेच सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेल्या प्रकाराचा तपशील:

लवजीत सिंह याचे लग्न 23 जानेवारी 2020 रोजी हरमनप्रीत कौरशी झाले.

लग्नाचा संपूर्ण खर्च लवजीतच्या कुटुंबीयांनी उचलला.

त्यानंतर हरमनप्रीत कौरला उच्च शिक्षणासाठी कॅनडाला पाठवण्यासाठी

सुमारे 28 लाख रुपये खर्च करण्यात आले.

यात कॉलेजची फी, राहण्याचा खर्च तसेच काही रोख रक्कम समाविष्ट होती.

कॅनडामध्ये गेल्यानंतर हरमनप्रीतने सुरुवातीला लवजीतशी संपर्क ठेवला,

कारण तिच्या शिक्षणाचा आणि राहण्याचा खर्च त्याच्याद्वारे पाठवला जात होता.

मात्र वर्क परमिट मिळाल्यानंतर हरमनप्रीतने ठणकावून सांगितले

की ती लवजीतशी कोणताही संबंध ठेवणार नाही व परत येण्यास नकार देईल.

व्यथित पतीने घेतलेले अंतिम पाऊल:

या प्रकारामुळे लवजीत मानसिक ताणाखाली आला.

30 ऑगस्टच्या संध्याकाळी त्याने विष प्राशन करून आपले जीवन संपवले.

कुटुंबीयांची तक्रार:

लवजीतच्या आई-वडिलांनी आरोप केला की, मुलाने पत्नी हरमनप्रीत कौर,

सासरा बलदीप सिंह आणि सासू सुरजीत कौर यांच्या फसवणुकी आणि त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवलं.

पोलीस कारवाई:

बेगोवाल पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर

पत्नी आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

अद्याप कोणालाही अटक केलेली नाही, पण चौकशी सुरु आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/estavar-prem-paishanwarun-suit-akhher-priyakarachaya-hatun-52-year-old-mahilechi-jhudpanthe-murder/