सीपीएम नेते सीताराम येचुरी यांचं निधन

दीललीत

दिल्लीत सुरू होते उपचार

CPI (M)  चे नेते आणि माजी राज्यसभा खासदार  सीताराम येचुरी

यांचं निधन झालं आहे. दिल्ली एम्स मध्ये त्यांना काही दिवसांपूर्वी

Related News

फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने दाखल करण्यात आले होते. आज 12

सप्टेंबर दिवशी अखेर त्यांचं निधन झाले आहे. ते 72 वर्षीय होते.

येचुरी यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून चिंताजनक होती.

त्यांना  respiratory support वर ठेवण्यात आल होते मात्र उपचारादरम्यान

त्यांचे निधन झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीताराम

येचुरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सीताराम येचुरी

यांचे निधन झाल्याचे ऐकून खूप दुःख झाले. ते अनुभवी खासदार होते. त्यांच्या

निधनाने देशाच्या राजकारणाची मोठी हानी झाली आहे. मी त्यांचे कुटुंबीय,

मित्र आणि सहकाऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करतो. सीताराम येचुरी यांच्या

निधनावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला

आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका पोस्टमध्ये राहुलने लिहिले की,

सीताराम येचुरी जी माझे मित्र होते. ते देशाच्या विचारांचे रक्षक आणि देशाची

सखोल जाण असलेली व्यक्ती होती. आमच्यात दीर्घकाळ चर्चा व्हायची.

या दुःखाच्या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि समर्थकांप्रती माझ्या संवेदना.

Read also: https://ajinkyabharat.com/dharna-movement-on-behalf-of-vidarbha-revenue-inspector-board-officer-association/

Related News