‘सी.पी. राधाकृष्णन उत्तम उपराष्ट्रपती ठरतील’ — PM मोदींचा खास व्हिडिओ चर्चेत
नवी दिल्ली : भाजपप्रणित एनडीएच्या वतीने सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत राधाकृष्णन यांचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी लिहिलं, “मला विश्वास आहे की सी.पी. राधाकृष्णन हे एक उत्कृष्ट उपराष्ट्रपती असतील!
मी त्यांना अनेक दशकांपासून ओळखतो आणि त्यांच्या सेवाभावाची जाणीव आहे.”
मोदी-राधाकृष्णनची जुनी मैत्री
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींनी राधाकृष्णन यांच्याशी असलेल्या आपुलकीच्या नात्यावर प्रकाश टाकला. व्हिडिओच्या सुरुवातीला मोदी म्हणाले —
“मी माझ्या एका खूप जुन्या मित्राची ओळख करून देत आहे. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, आमचं नातं अनेक दशकांचं आहे.
कधी काळी माझेही केस काळे होते आणि राधाकृष्णनजींचे केसही काळे होते.”
या व्हिडिओमध्ये मोदी आणि राधाकृष्णन यांचे जुने फोटो दाखवले गेले असून, दोघांच्या दीर्घकाळच्या मैत्रीची झलक यात दिसून येते.
उमेदवारीनंतर चर्चा तेज
एनडीएने उमेदवारी दिल्यानंतर राधाकृष्णन यांचं नाव राजकीय वर्तुळात चर्चेचं केंद्र बनलं आहे.
मोदींनी केलेल्या कौतुकामुळे त्यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाल्याचं मानलं जात आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/railway-pulachaya-khadyat-four-balakancha-budoon-died/