न्यायालयात सीरिजवर बंदीची मागणी

समीर वानखेडेंचा आर्यन खानवर थेट निशाणा”

समीर वानखेडेंनी आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’वर साधला निशाणा, 2 कोटींच्या मानहानीचा दावाबॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करताच चर्चेत आला आहे. त्याचा नवीन नेटफ्लिक्स शो ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ प्रदर्शित झाला, पण सध्या या शोवर मोठा वाद निर्माण झाला आहे.2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी शोवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली असून, चार महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत:

शोमध्ये समीर वानखेडे सारख्या पात्राची खिल्ली उडवली गेली असून, राष्ट्रीय चिन्ह “सत्यमेव जयते” याचा अपमान झाल्याचा दावा. समाजात ड्रग्जविरोधी लढा देणारे एनसीबी अधिकारी वाईट पद्धतीने दाखवले गेले आहेत. चालू प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप. शोमध्ये व्हेपिंग, धूम्रपान व मद्यपान यासारखी दृश्ये दाखवली गेली आहेत, ज्यावर NHRC ने आक्षेप घेतला. यानुसार, समीर वानखेडे यांनी 2 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला असून, त्यांनी ही रक्कम मिळाल्यास ती टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलला देण्याची तयारी दर्शवली आहे. शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट कंपनी या शोची निर्मिती करत असली तरी त्यांनी अद्याप कोणतंच वक्तव्य केलेले नाही.

read also:https://ajinkyabharat.com/pudil-24-tas-dhokyache/