सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी

सततच्या पावसामुळे तीन वेळा पेरणी वाया; शेतकऱ्यांचा आक्रोश, नुकसानभरपाईची मागणी

पातूर तालुक्यातील पिंपळडोळी, चिंचखेड आणि आलेगाव परिसरातील शेतकऱ्यांना सततच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे.

सोयाबीन बियाण्याची तीन वेळा पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे बियाणे उगवले नाही, परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तहसीलदार राहुल वानखडे यांना निवेदन देत तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहेमुख्य मुद्दे:

Related News

  • २५-२६ जून रोजी १४५ मिमी अतिवृष्टी

  • नंतर सलग आठवडा जुलैमध्ये जोरदार पाऊस

  • तीन वेळा पेरणी करूनही पिके उगवली नाहीत

  • शासनाकडून आर्थिक मदतीसाठी पंचनाम्यांची मागणी

 निवेदनावर स्वाक्षऱ्या:

सागर देशमुख, इसुब खान, दिलीप ताजने, अयुफ खान, सखाराम गावंडे, तुकाराम ढोके, सुधाकर धाईत, किशोर ताजने, वर्धमान ताजने, मिलिंद सरकटे आणि अन्य शेतकरी उपस्थित होते.

सततच्या हवामान बदलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून शासनाने तत्काळ मदत जाहीर करून पंचनामे पूर्ण करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

Read Also : https://ajinkyabharat.com/deorifata-complex-both-motorcycalini-samorasamore/

Related News