सतत जांभई येत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा; तुम्हाला असू शकतात ‘या’ आरोग्यविषयक गंभीर समस्या

सतत जांभई येत असल्यास लगेच डॉक्टरांना भेटा; तुम्हाला असू शकतात 'या' आरोग्यविषयक गंभीर समस्या

Excessive Yawning Disease Symotoms: आपल्याकडे सामान्यपणे जांभईला झोप किंवा कंटाळ्याशी जोडलं जातं.

मात्र वारंवार जांभई येत असेल तर वेळीच सावध होणं गरजेचं आहे.

सतत जांभई येण्याचा नेमका अर्थ काय असतो आणि ते कशाकडे इशारा करतं जाणून घ्या…

Related News

सामान्यपणे जांभईला झोप येण्याशी किंवा कंटाळा येण्याशी जोडून पाहिलं जातं.

जांभई दिल्याने मेंदू आणि शरीराला आळस झटकण्याची संधी मिळते असं म्हटलं जातं.

मात्र तुम्हाला दिवस-रात्र सातत्याने जांभई येत असतील तर हा प्रकार हलक्यात घेता येणार नाही.

वारंवार जांभई येणं हे अनेक आजारांचं लक्षणं मानलं जातं. याचसंदर्भात जाणून घेऊयात…

जास्त जांभई देणे म्हणजे काय?

सातत्याने आणि नियमितपणे जांभई येत असेल तर हृदयासंदर्भात किंवा थेट मानसिक आरोग्यासंदर्भात

समस्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असं या विषयातील जाणकार सांगतात.

मात्र किती वारंवार जांभई आल्यास तो धोक्याचा इशारा समजावा?

याबद्दल सर एनएन रिलायन्स हॉस्पीटलमधील इंटर्नल मेडिसीन विभागाच्या डॉक्टर दिव्या गोपाल यांनी,

“अधिक प्रमाणात जांभया येणं म्हणजे किती हे निश्चित आकड्याने सांगता येत नाही.

ही संख्या व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते,” असं सांगितलं.

मात्र वारंवार जांभई येत असेल आणि शुद्ध हरपल्यासारखं वाटणं, श्वास अपुरा पडणं, गुंगी येणं अशा समस्या

जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांना भेटण्याचा सल्ला दिला जातो.

अशा गोष्टी काही विशेष कारणाने होतात असं नाही हे सारं अचानकही घडू शकतं.

अती जास्त जांभया देणं का दर्शवतं?

झोपेची कमतरता – पुरेशी झोप झाली नसेल किंवा नीट झोप झाली नसेल तर वारंवार जांभई येते.

कंटाळा येणे – मानसिक थकवा आला असेल तरी वारंवार जांभई येते.

हृदयासंदर्भातील समस्या – सातत्याने जांभई येण्याचं कनेक्शन व्हेगस नर्व्हशी असतं.

ही नस मेंदूमधील हृदयामार्ग पोटापर्यंत जाते.

न्युरोलॉजीसंदर्भातील समस्या – काही प्रकरणांमध्ये वारंवार जांभई येणं हे मज्जासंस्थेशीसंबंधित आजारांशी संलग्न असू शकतं.

उदाहरणच द्यायचे झाले तर एपिलिप्सीचं उदाहरण देता येईल.

मेंदूशी संबंधित समस्या – अगदीच दुर्मिळ प्रकारामध्ये सातत्याने जांभई येणं हे ब्रेन ट्युमर असल्याचंही लक्षणं मानलं जातं.

“रक्ताच्या माध्यमातून ऑक्सिजनचं वहन करण्यासाठी लोह हा महत्त्वाच घटक आहे.

रक्तात लोहाचं प्रमाण कमी होतं तेव्हा शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते.

त्यामुळेच वारंवार जांभई येते. शरीरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन घेण्याच्या

उद्देशाने अशावेळी जांभई दिली जाते, असं डॉक्टर गोपाल यांनी सांगितलं.

स्लिप अपेनिया किंवा फुफ्फुसांसंदर्भातील समस्यांमुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि वारंवार जांभई येते.

घरच्या घरी यावर उपाय कसा करावा?

आवश्यक तितकी झोप घेणे – झोपेचा कलावधी आणि दर्जेदार झोप मिळेल असं वेळापत्रकाचं नियोजन करावं.

लोहाचं प्रमाण वाढवणं – लोहयुक्त पदार्थांचं सेवन वाढवालं पाहिजे. यामध्ये पालक, सफरचंदसारख्या गोष्टींचा समावेश करता येईल.

Related News