दूषित पाणीपुरवठ्यामुळे देगावात आरोग्याचा प्रश्न

बाळापूर (जि. अकोला) – देगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे गावातील शेकडो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या मोठ्या टाकीजवळ स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याने दूषित पाणी नागरिकांच्या घरी पोहोचत असून जलजन्य आजारांना आमंत्रण दिले जात आहे.

घाणीचे ठिकाण बनलेली टाकी

पाणीपुरवठा टाकीच्या आसपास काही नागरिक शौचास बसतात, तर परिसरातच गुरे-ढोरे बांधली जातात.

त्यामुळे निर्माण होणारी घाण थेट नळातून पाण्यात मिसळून नागरिकांच्या घराघरांत पोहोचत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

गावातील अनेकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. “गावाचा विकास करणारच का?” असा सवाल नागरिकांकडून करण्यात आला आहे.

सरपंचांचा आश्वासक प्रतिसाद

या संदर्भात देगावच्या सरपंच दिपाली सरदार यांनी सांगितले की,

“आम्ही उद्या सकाळीच टाकीखालची पूर्ण साफसफाई करून घेऊ. तसेच वावरच्या भिंतीला गेट बसवून परिसर सुरक्षित केला जाईल.”

 दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असले तरी, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक झाले आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/bhamberit-swatantriyantin-khas-bhet-vidyarthayanchaya-hatat-kya-alan/