काँग्रेसचे अमित शाहांना पत्र

राहुल गांधींना गोळी मारण्याची धमकी !

काँग्रेसच्या विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांना एका टीव्ही चॅनलवरील चर्चेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावर काँग्रेसने गंभीर दखल घेतली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तातडीने कारवाई करण्यासाठी पत्र लिहले आहे.केसी वेणुगोपाळ यांनी लिहिलेल्या या पत्रात म्हटले आहे की, सुरुवातीला राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरून त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला, आता थेट गोळी मारण्याची भाषा वापरली जात आहे. त्यामुळे पिंटू महादेव यांच्याविरोधात त्वरित एफआयआर नोंदवून कारवाई करावी, अशी मागणीही पत्रात केली आहे.ही घटना केरळच्या एका न्यूज चॅनलवर घडली. चर्चेचा विषय लडाखमधील उफाळलेल्या हिंसाचाराचा होता. कार्यक्रमात भाजपच्या बाजू मांडताना एबीव्हीपीचे माजी अध्यक्ष पिंटू महादेव यांनी राहुल गांधींना ‘गोळी मारली जाईल’ असे स्पष्ट सांगितले.काँग्रेसने या पत्रात पुढे सांगितले की, राहुल गांधींच्या कुटुंबातील दोन व्यक्ती — इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची आधीच हत्या झाली आहे. त्यामुळे या प्रकाराच्या धमकीला दुर्लक्ष करता येणार नाही. हे पत्र काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही पोस्ट करण्यात आले असून अनेक नेत्यांना टॅग केले गेले आहेत.दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांनी देखील राहुल गांधींना मिळालेल्या धमकीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, राहुल गांधींची सुरक्षा धोक्यात आहे आणि यावर त्वरित कारवाई होणे गरजेचे आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/s/

Related News