बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे गाय चोरीच्या कारणावरून एका तरुणाला निर्वस्त्र करून बेदम
मारहाण केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता राजकारण तापलं आहे.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या या युवकावर अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ स्वतः अकोल्यात दाखल झाले.
त्यांनी पीडित युवकाची भेट घेऊन त्याची विचारपूस केली. यावेळी सपकाळ यांनी दोषींवर
कठोर कारवाई होणारच असा इशारा दिला. हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
“कोणत्याही प्रकारची चूक नसताना विनाकारण मारहाण करण्यात आली आहे.
हे संतोष देशमुख प्रकरणासारखेच गंभीर प्रकरण आहे.
दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशी काँग्रेसची ठाम मागणी आहे.”
दरम्यान माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी सरकारवर थेट गंभीर आरोप केले.
त्यामुळे या घटनेभोवतीचं राजकीय वातावरण आणखी पेटण्याची चिन्हं दिसत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/