जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे.
ही निवडणूक काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रन्स एकत्रितपणे लढणार
आहेत. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी गुरुवारी राहुल गांधी
Related News
धामणा बुद्रुक येथे कॉलऱ्याचा शिरकाव; एकाचा मृत्यू, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
अकोल्यातील शेतकऱ्याचा मुलगा बनला ‘क्रिकेट पंच’
धोंडा आखर येथे ‘प्रधानमंत्री धरती आबा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परशुराम नाईक विद्यालयाचे तंबाखू मुक्त अभियान कौतुकास्पद – न्यायाधीश आर. एन. बंसल यांची प्रशंसा
बोर्डी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार : सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त
इंझोरी महसूल मंडळात २०० एकरांवर दुबार पेरणीचे संकट
“आपके नाम से हर शख्स…” शिंदेंचा शेर आणि ‘जय गुजरात’ घोषणेने चर्चांना उधाण!
सेंट पॉल्स अकॅडमी ,अकोट येथे शाळेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा
गजानन नागरी पतसंस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार? ठेवीदारांची गर्दी, उपनिबंधकांकडे तक्रार
शाळेचा पहिला ‘आनंददायी’ दिवस !
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात :
नागपूरमध्ये वैद्यकक्षेत्राची क्रांती : कॅन्सरमुळे लिंग गमावलेल्या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया
आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबतच्या दीर्घ बैठकीनंतर ही घोषणा केली.
अब्दुल्ला म्हणाले, आम्ही लवकरच जागावाटपाची घोषणा करू आणि
जाहीरनामाही प्रसिद्ध करू. यावेळी, माध्यमांनी पीडीपीलाही सोबत
आणण्यासंदर्भात केलेल्या प्रश्नावरही त्यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली.
ते म्हणाले, कुण्याही समविचारी पक्षासाठी आमचे दरवाजे बंद नाहीत.
भविष्यात कुठल्याही मुद्द्यावर विचार केला जाऊ शकतो. तसेच,
विजयी झाल्यास मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर त्यांनी हसत उत्तर देणे टाळले.
फारूक अब्दुल्ला पुढे म्हणाले, ‘येथील लोकांनी 10 वर्ष संघर्ष केला आहे.
आता आम्ही त्यांच्यासाठी आशा करतो की राज्याचा दर्जा पुन्हा बहाल केला जाईल.
फारूक म्हणाले, आघाडीसंदर्भात आमची चर्चा सुरू आहे. यावर लवकरच काही
निर्णय होईल. फुटिरतावादी शक्तींना एकत्रितपणे हाटवण्याचा आमचा संकल्प आहे.
आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढू. लवकरच जागांसंदर्भातही घोषणा होईल.
तसेच, जम्मू-काश्मीरला लवकरच सर्व अधिकार मिळतील, अशी आशा आहे,
असेही ते म्हणाले तत्पूर्वी, जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे
पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले, “आम्ही येथे कार्यकर्त्यांना निवडणुकीची माहिती
देण्यासाठी आलो आहोत. सर्व विरोधकांना सोबत घेऊन पुठे चालण्याची
राहुल गांधी यांची इच्छा आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना
खर्गे म्हणाले, “INDIA चा परिणाम आपण बघितला आहेत. आपण हुकूमशहाला पूर्ण
बहुमत मिळण्यापासून रोखले आहे. त्यांना तीन कायदे मागे घेण्यासही भाग पाडले आहे.”
Read also: https://ajinkyabharat.com/south-star-vijayachi-rajkarnar-makes-a-strong-entry/