काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन

वयाच्या

वयाच्या 64 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार

वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी

Related News

वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मोठ्या कालावधीपासून

वसंत चव्हाण आजारी होते. आधी नांदेडच्या रूग्णालयात त्यांना दाखल

करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत काही सुधार होत नव्हता. त्यांची

प्रकृती ढासळत असल्याने त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला

उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. हैदराबादमधील किम्स

हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच उपचारादरम्यान त्यांची

प्राणज्योत मालवली.  नुकत्याच झालेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीत

त्यांनी विजय मिळवला होता. तत्कालिन भाजप खासदार प्रतापराव पाटील

चिखलीकर यांचा त्यांनी पराभव केला. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला

रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेससाठी नांदेडमधील हा विजय

महत्वपूर्ण होता. त्यामुळे चव्हाण यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/shraddha-kapoor-is-the-indian-actress-with-most-instagram-followers/

Related News