राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील रामगड मतदारसंघातील
काँग्रेस आमदार जुबेर खान यांचे शनिवारी सकाळी निधन झाले.
अनेक दिवसांपासून आजारी असलेले आमदार जुबेर खान यांनी पहाटे
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
5.50 वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजस्थान
विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या आता 65 झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, जुबेर खान हे अलवर जिल्ह्यातील रामगढ मतदारसंघातून
काँग्रेसचे आमदार होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर
उपचार सुरू होते. आमदार जुबेर खान यांनी आज पहाटे 5.50 वाजता
अलवरमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूची माहिती त्यांची पत्नी
साफिया जुबेर यांनी दिली. साफिया जुबेर या राजकारणातही सक्रिय आहेत.
झुबेर खान यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
ते एक अनुभवी आणि समर्पित नेते होते, ज्यांनी अलवर जिल्ह्यात काँग्रेस मजबूत
करण्यात भूमिका बजावली. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक राजकीय
नेत्यांनी झुबेर खान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. झुबेर खान यांना ट्वीट करून
श्रद्धांजली वाहताना अशोक गेहलोत म्हणाले की, झुबेर खान यांचे निधन हे पक्षाचे
कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आमदार जुबेर खान यांच्या निधनाने राजस्थान
विधानसभेतील काँग्रेस आमदारांची संख्या 65 झाली आहे. 200 सदस्यांच्या विधानसभेत
आता एकूण सात जागा रिक्त आहेत, त्यापैकी लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या
आमदारांच्या राजीनाम्यामुळे पाच जागा रिक्त झाल्या आहेत. भाजपच्या एका आमदाराचाही
नुकताच मृत्यू झाला. जुबेर खान यांच्या निधनामुळे पक्ष आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.