डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस पुन्हा आक्रमक

डॉ. बाबासाहेब

दोषींकडून दहा कोटी रुपये वसूल करण्याची मागणी 

नागपूरच्या अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची

पुनर्बांधणी करण्यासाठी राज्य सरकारने देऊ केलेल्या 10 कोटी रुपयांतून

Related News

लवकरात लवकर सांस्कृतिक भवन उभारावं, अशी मागणी काँग्रेस आमदार

विकास ठाकरे यांनी केली आहे. तसेच ज्या खाजगी कंपनीने नियमबाह्य पद्धतीने

जुने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडलं होतं,

त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून हे दहा कोटी रुपये वसूल करण्यात यावे,

अशी मागणी ही विकास ठाकरे यांनी केली.

मुळातच महापालिकेच्या मालकीची कुठलीही इमारत पाडायची असेल,

तर त्यासाठी महापालिकेच्या सभागृहाची तसेच शासनाची परवानगी लागते.

मात्र, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या बाबतीत खाजगी कंपनीने

या नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळेच त्या खाजगी कंपनीवर गुन्हे दाखल झाले होते.

आता जनतेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन

पुन्हा उभारण्याची मागणी होत असताना, राज्य सरकारने ती मागणी पूर्ण केली आहे

आणि त्यासाठी शासनाने दहा कोटी मंजूर ही केले आहेत.

त्यामुळे त्या निधीतून लवकरात लवकर हे भवन उभारावे आणि ज्या खाजगी कंपनीने

नियमबाह्य पद्धतीने जुने सांस्कृतिक भवन पाडले होते.

त्यांच्याकडून ते दहा कोटी रुपये वसूल करण्यात यावे,

अशी मागणी काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केली आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/30-thousand-students-of-zilla-parishad-schools-are-still-deprived-of-uniform/

Related News