काँग्रेस आमदार ऑनलाइन बेटिंग प्रकरणात पकडले

काँग्रेस आमदार K.C. वीरेंद्र अटकेत, १२ कोटी रोख जप्त

ऑनलाइन गेमिंग रॅकेटवर ईडीची मोठी धाड : काँग्रेस आमदार K.C. वीरेंद्र अटकेत, १२ कोटी रोख व सोनं जप्त

 बेंगळुरू :ऑनलाइन गेमिंग आणि सट्टेबाजीवर सरकारनं नुकताच नवा कायदा लागू केल्यानंतर ईडीने मोठी कारवाई केली आहे.

कर्नाटकचे काँग्रेस आमदार K.C. वीरेंद्र ऊर्फ वीरेंद्र पप्पी यांना गंगटोक येथून अटक करण्यात आली.

ईडीने बेंगळुरू, चित्रदुर्ग, मुंबई, गोवा आणि गंगटोक अशा एकूण ३१ ठिकाणी छापे मारले.

या धाडीत ईडीला तब्बल १२ कोटी रुपयांची रोख रक्कम (त्यात १ कोटी परकीय चलन),

६ कोटींचं सोनं, १० किलो चांदी आणि ४ लक्झरी गाड्या सापडल्या. याशिवाय १७ बँक खाते आणि दोन लॉकर गोठवण्यात आले आहेत.

बेटिंग साइट्स आणि पैसा फिरवण्याचा खेळ

तपासानुसार आमदार वीरेंद्र आणि त्यांचा भाऊ King567 व Raja567 या बेटिंग साइट्स चालवत होते.

  • पैसा दुबईमार्गे Diamond Softech, TRS Technologies आणि Prime9 Technologies या कंपन्यांमधून फिरवला जात होता.

  • कॉल सेंटर आणि ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून अवैध कमाई केली जात होती.

  • या पैशाचा उपयोग विविध व्यवसाय आणि मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी केला जात होता.

गोव्यातील कॅसिनोंवर छापे

ईडीने गोव्यातील ५ मोठ्या कॅसिनोंवर धाड टाकली. यात पप्पीज कॅसिनो गोल्ड, ओसियन रिव्हर्स कॅसिनो, पप्पीज कॅसिनो प्राईड, ओसियन 7 कॅसिनो आणि

बिग डॅडी कॅसिनो यांचा समावेश आहे. या कॅसिनोंमधून ऑनलाइन बेटिंग रॅकेटचे धागेदोरे मिळाल्याचं सांगण्यात आलं.

अटक आणि पुढील कारवाई

आमदार वीरेंद्र गंगटोकमध्ये नवा कॅसिनो लीजवर घेण्यासाठी गेले असताना ईडीने त्यांना अटक केली.

त्यांना न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड मिळवण्यात आला असून लवकरच त्यांना बेंगळुरू कोर्टात नेलं जाणार आहे.

ईडीने ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) अंतर्गत केली आहे.

या तपासातून आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवली जाते.

Read also :https://ajinkyabharat.com/tya-marathi-actresses-govinda-sunita-natyababat-akhher-satya-samor-alan/