गायक अदनान सामी यांना मातृशोक

७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास

लोकप्रिय गायक आणि बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गाणी

गाणारे अदनान सामी यांची आई बेगम नौरीन सामी खान यांचं

Related News

निधन झाल आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी अदनानच्या आईने

अखेरचा श्वास घेतला. अदनान यांनी आज सोमवारी सोशल

मीडियाच्या माध्यमातून ही बातमी सर्वांना सांगितली. ही दुःखद

बातमी समोर येताच अदनानच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या

माध्यमातून अदनानच्या आईला श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त

केला. अदनान यांनी आईचा फोटो पोस्ट करुन त्याखाली भावुक

पोस्ट लिहिली आहे. अदनान लिहितात, “माझी आई बेगम नौरीन

सामी खान यांच्या निधनाची बातमी सांगताना मला खूप दुःख

होतंय. आईच्या निधनामुळे आम्ही शोकसागरात बुडालो आहोत.

माझी आई एक अविश्वसनीय स्त्री होती. माझ्या आईच्या संपर्कात

जे व्यक्ती आले त्यांना कायम आईने प्रेम आणि आनंद दिलाय.

मला तिची खूप आठवण येईल. आईसाठी तुम्ही सर्वांनी प्रार्थना

करा. माझ्या प्रिय आईच्या आत्म्याला शांती मिळो”.

Read also: https://ajinkyabharat.com/praharcha-mla-bachchu-kadunchi-with-sodanar/

Related News