भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा वाद कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे.
अनुराग ठाकूर यांच्या भाषणाचे कौतुक केल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल केली आहे.
जालंधरचे खासदार आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्त्री यांनी
लोकसभेच्या महासचिवांकडे ही तक्रार केली आहे.
हिमाचल प्रदेशच्या हमीरपूरमधून पाच वेळा खासदार राहिलेले अनुराग ठाकूर
यांच्या वक्तव्यावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला
आणि म्हटले की, माझ्या तरुण आणि उत्साही सहकाऱ्याचे हे भाषण ऐकलेच पाहिजे.
तथ्ये आणि विनोद यांचे परिपूर्ण मिश्रण, जे इंडिया आघाडीचे घाणेरडे राजकारण उघड करते.
चरणजीत सिंह चन्नी यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की,
अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान अनेक आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या.
नंतर त्या स्पीकरने रेकॉर्डमधून काढून टाकल्या.
मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर अनुराग ठाकूर
यांच्या भाषणाचा संपूर्ण भाग ट्विट केला आहे. हे लोकसभेच्या नियमांचे उल्लंघन आहे.
अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींविरोधात केलेल्या वक्तव्यावर
विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया केल्या होत्या. लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेल्या भाजपच्या
ज्येष्ठ खासदार जगदंबिका यांनी रेकॉर्डमधून टिप्पण्या काढून टाकल्या जातील, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, संसदेत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून
सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत.
काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, कार्यवाहीतून काढलेल्या टिप्पण्या
ऑनलाइन अपलोड केलेल्या व्हिडिओंमधून संपादित करून काढून टाकल्या जातात.
पण संसद टीव्हीने या प्रकरणातील अनुराग ठाकूर यांचे भाषण एडिट न करता अपलोड केले.
भारताच्या संसदीय इतिहासातील ही लाजिरवाणी घटना आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/heavy-rain-in-delhi-kerala/