स्पर्धेच्या युगात माणुसकी जिवंत ऑटो चालकानी !

स्पर्धेच्या युगात माणुसकी जिवंत ऑटो चालकानी !

चंदन जंजाळ

बाळापूर ताप्र :- आताच्या युगात माणसाच्या जगण्याचा प्रवास हा स्वतःबरोबर इतरांनाही आनंद देणारा असावा .

आजच्या या धकाधकीच्या जीवनात माणुसकीचे रोपटं उगवेल का अशी आशा लावून बसणंही दिवास्वप्ना सारखे

वाटतं परंतु अकोल्यातील एका ऑटो रिक्षा चालक नाव शाहिद खान यांनी दाखवलेली एक

माणुसकीच जिवंत उदाहरण म्हणजे दिवसा दिसलेल्या सत्यात उतरलेल्या स्वप्नांसारख दिसुन आले आहे

अमरावती वरुन आलेल्या प्रतिक्षा नरेंद्र इंगळे ह्या काही अकोला रेल्वे स्टेशन वरुन बस स्टॉप येथे आले असता ऑटो रिक्षा मध्ये प्रवास केला

असता घाई-घाई मध्ये २५ ते २८ हजार रुपये महागाचा मोबाईल शाहिद खान यांच्या ऑटो मध्ये विसरले असे

लक्षात आले व त्यानंतर प्रतिक्षा ताईनी लगेच जिथुन आपण त्या ऑटो रिक्षा मध्ये बसलो तीथेच जाऊन

उभ्या राहिल्या व दुसऱ्याच्या नंबर वरून कॉल करायला सांगितले व तेव्हा शाहिद खान यांना त्या मोबाईलचा

आवज आला व त्यांना लगेच समजलं कि आपल्या ऑटो मध्ये बसलेली व्यक्ती मोबाईल विसरली म्हणून शाहिद खान यांनी लगेच

ऑटो रिक्षा प्रतिक्षा ताई इंगळे यांच्याकडे वळवला आणि त्यांचा मोबाईल

परत करुन अजुन पण या स्पर्धेच्या युगात माणुसकी जिवंत आहे असे या यावरुन समजुन‌ येते.

Read Also : https://ajinkyabharat.com/shahar-tail-gund-triplich-02-sarait-accused-kalam-58-maharashtra-polys-qaida-proof