अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सध्या प्रशासनाचा ताबा असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकत्वाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची नागरिकता मिळवणे आता पूर्वीपेक्षा अधिक कठीण होणार आहे. ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले आहे की 2025 पासून नागरिकत्व हवे असल्यास नागरिकशास्त्राची लेखी परीक्षा देणे अनिवार्य असेल.
इमिग्रेशन विभागाच्या माहितीनुसार, ही परीक्षा अमेरिकेचा इतिहास, सरकारव्यवस्था आणि राजनीती याबद्दल असेल. नागरिकत्व मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना इंग्रजी भाषेतून 128 प्रश्नांपैकी किमान 12 प्रश्नांची अचूक उत्तरे द्यावी लागतील. या परीक्षेतून उमेदवाराची वाचन, लेखन व संभाषणाची क्षमता तपासली जाईल.
USCIS चे प्रवक्ते मैथ्यू यांनी म्हटलं की, “अमेरिकेचे नागरिकत्व हे जगातील सर्वात मौल्यवान आहे. त्यामुळे नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना अमेरिकेच्या इतिहास व सरकारची सखोल माहिती असावी, हा आमचा उद्देश आहे.”
बायडेन प्रशासनाच्या काळात ही परीक्षा रद्द करण्यात आली होती, ज्यामुळे हजारो जणांना दिलासा मिळाला होता. मात्र ट्रम्प प्रशासनाने पुन्हा ती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसाबाबत कठोर बदल केले होते, ज्याचा थेट फटका भारतीय व्यावसायिकांना बसला. सतत व्हिसा व इमिग्रेशन धोरणांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे अमेरिकेत जाण्याचे व तिथे स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहणार आहेत.
भारतातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होऊ शकतो.
read also :https://ajinkyabharat.com/actor-robo-shankar-yancha-dies/