मुंबई मेट्रो मार्ग – ३ (कुलाबा-वांद्र-सीप्झ) हा शहरातील सर्वात वर्दळीच्या भागातून जाणारा भूयारी कॉरिडॉर असून, या मेट्रोच्या सुरुवातीने प्रवाशांना वेळ आणि सुविधा यामध्ये मोठा फायदा होणार आहे. मेट्रो मार्ग – ३ ची दुसऱ्या टप्प्याची यशस्वी चाचणी पूर्ण झाली असून, लवकरच प्रवासासाठी संपूर्ण मार्ग उपलब्ध होणार आहे. प्रवाशांना दर ३ मिनिटांनी ट्रेन मिळणार आहे, ज्यामुळे ट्रॅफिक जाममध्ये वेळ घालवण्याची गरज राहणार नाही.
कनेक्टिविटी: मेट्रो कुलाबा ते सीप्झ मार्गावर वांद्रे, कुर्ला आणि एअरपोर्टसह महत्वाच्या ठिकाणांना जोडेल.
फ्रीक्वेंसी: दर ३ मिनिटांनी एक ट्रेन, त्यामुळे वाट पाहावी लागणार नाही.
वेळेची बचत: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते सीप्झचा प्रवास आता फक्त २५ मिनिटांत.
गर्दीचे नियोजन: उपनगरीय लोकल ट्रेन आणि BEST बसांची गर्दी कमी होण्यास मदत.
सुविधा: वातानुकूलित कोच, आधुनिक इंन्फ्रास्ट्रक्चर, पर्यायी मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ.
प्रभाव: मेट्रो मार्गिका – ३ आशियातील सर्वात आधुनिक अंडरग्राऊंड मेट्रो मार्गिका मानली जाते. दर ३ मिनिटांनी सुटणाऱ्या ट्रेनमुळे न केवळ उपनगरीय लोकलची गर्दी कमी होईल, तर रस्त्यावरील वाहतूकही सुरळीत होईल. मुंबईकरांचे जीवनमान या मेट्रो मार्गिकेने बदलणार आहे.
read also:https://ajinkyabharat.com/sagarrat-ghadatay-kahitari-ajab/