आता रशियात WhatsApp आणि Telegram कॉल्सवर बंदी

आता रशियात WhatsApp आणि Telegram कॉल्सवर बंदी

आता रशियात WhatsApp आणि Telegram कॉल्सवर बंदी

मॉस्को | 15 ऑगस्ट 2025

रशियन सरकारने WhatsApp आणि Telegram या लोकप्रिय मेसेजिंग अँप्सवरील कॉलिंग सुविधा आंशिक स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

रशियन इंटरनेट नियामक संस्था Roskomnadzorने सांगितले की हा निर्णय गुन्हेगारी, फसवणूक आणि दहशतवादी हालचालींवर आळा घालण्यासाठी घेण्यात आला आहे.

बंदीमागचं कारण

सरकारचा दावा आहे की परदेशी मेसेजिंग प्सचा वापर रशियन नागरिकांना फसवणूक, पैशांची उकळपट्टी, तोडफोड आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील करण्यासाठी होत होता.

अँप कंपन्यांना अनेकदा कठोर पावलं उचलण्याची सूचना देण्यात आली, मात्र त्यांनी ती पाळली नाही.

इंटरनेटवरील सरकारी पकड वाढतेय

गेल्या काही वर्षांत रशियाने इंटरनेटवर नियंत्रण वाढवण्यासाठी कडक कायदे केले, नियम न पाळणाऱ्या वेबसाईट्स ब्लॉक केल्या आणि ऑनलाईन ट्रॅफिकवर लक्ष ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केलं.

नागरिक VPN वापरून या निर्बंधांना चकवतात, पण सरकार वेळोवेळी VPN सेवांवरही बंदी आणते.

नवीन कायदा आणि MAX मेसेंजर

अलीकडेच रशियाने MAX नावाचं राष्ट्रीय मेसेजिंग अँप लाँच केलं आहे. यात मेसेजिंगसोबत सरकारी सेवा आणि पेमेंट्सची सुविधाही असेल.

हे अँप देशातील प्रत्येक स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल असणं बंधनकारक असेल आणि गरज भासल्यास युजर्सचा डेटा अधिकाऱ्यांना दिला जाईल.

युजर्सवर परिणाम

जुलै महिन्यात WhatsApp हा रशियातील सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म होता, ज्याचे 9.6 कोटी मासिक युजर्स होते. Telegramचे युजर्स 8.9 कोटी होते. कॉलिंग सेवांवरील निर्बंधांमुळे आता या दोन्ही अँप्सचे वापरकर्ते मेसेजिंगवरच अवलंबून राहतील.

रशियाचा हा निर्णय देशातील इंटरनेट स्वातंत्र्य आणि गोपनीयतेबाबत नव्या चर्चांना तोंड फोडतो आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/gst-cassilchi-pudil-meeting-support/