Asia Cup 2025 : दहा वर्षांपूर्वी टी-20I पदार्पण, आता पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी!
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांत होणार आहे.
9 सप्टेंबरपासून यूएईत सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई अ गटात असून, भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत खेळण्याबाबत वाद निर्माण झाला असला, तरी अद्याप सामना रद्द होण्याचा निर्णय झालेला नाही.
या स्पर्धेत 2015 मध्ये टी-20I पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनची निवड निश्चित असल्याची चर्चा आहे.
जुलै 2015 मध्ये झिंबाब्वेविरुद्ध पहिला सामना खेळणाऱ्या संजूला सुरुवातीच्या काळात सातत्याने संधी मिळाली नव्हती.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या दमदार फलंदाजीमुळे तो संघाचा अविभाज्य भाग बनला आहे.
नियमित विकेटकीपर ऋषभ पंत दुखापतीमुळे बाहेर असल्याने संजूचा दावा अधिक मजबूत झाला आहे.
संजूने आतापर्यंत भारतासाठी 42 टी-20I सामने खेळून 3 शतकं व 2 अर्धशतकांसह 861 धावा केल्या आहेत.
त्याची सरासरी 25.32 आणि स्ट्राईक रेट 152.38 आहे. विशेष म्हणजे, संजूने पाकिस्तानविरुद्ध अद्याप एकही सामना खेळलेला नाही.
सामना रद्द न झाल्यास यंदा त्याला पहिल्यांदाच या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/swatantriyadinachaya-speech-maharashtriyal-sarpanch-bharwale/