“आता या मुद्यावर विचार करण्याची गरज नाही”-डोनाल्ड ट्रम्प

“आता या मुद्यावर विचार करण्याची गरज नाही”-डोनाल्ड ट्रम्प

Trump-Putin Alaska Meeting : भारतावर टॅरिफबाबत ट्रम्पची पहिली प्रतिक्रिया, “आता या मुद्यावर विचार करण्याची गरज नाही”

अलास्का : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी अलास्कामध्ये ऐतिहासिक भेट झाली.

या बैठकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. विशेष म्हणजे, भारतावर लावण्यात आलेल्या ५० टक्के टॅरिफच्या मुद्यावर ट्रम्प यांनी पहिली मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, “सध्या रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची आवश्यकता नाही. या विषयावर दोन-तीन आठवड्यांनी पुन्हा विचार करू शकतो,

पण सध्या तरी कोणताही नवा निर्णय घेणार नाही,” असं त्यांनी फॉक्स न्यूजला सांगितलं.

रशिया-युक्रेन युद्धावर ठोस तोडगा नाही

या बैठकीत रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत एकमत झालं नाही. तरीदेखील तब्बल तीन तास चाललेल्या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये संवादाची नवी दारं उघडली गेली आहेत.

ट्रम्प यांनी बैठकीपूर्वी इशारा दिला होता की, चर्चा सकारात्मक वाटली नाही तर ते दोन मिनिटांत उठून जातील. पण दीर्घकाळ चर्चा झाल्याने ती सार्थक ठरल्याचं चित्र आहे.

भारतावर टॅरिफ आणि ट्रम्पचा दावा

भारत सध्या ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणामुळे अडचणीत सापडला आहे. आयात-निर्यातीत अडथळे निर्माण झाल्याने रोजगार आणि उत्पन्न या दोन्हीवर परिणाम झाला आहे.

मात्र या बैठकीनंतर ट्रम्प यांनी मोठा खुलासा करताना सांगितलं की, “भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यामुळेच रशिया भेटीसाठी पुढे आलं.

भारताला सांगितलं होतं की, रशियाकडून तेल घेतलं तर टॅरिफ लागेल. त्यानंतर रशियाने संपर्क साधून ही बैठक घडवून आणली,” असा दावा ट्रम्प यांनी केला.

या विधानामुळे आता अमेरिका-रशिया-भारत या तिहेरी समीकरणाकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुतूहलाने पाहिलं जात आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/nathabhauchaya-manat-tar-mehi-swatala-stuck/