अकोट तालुका क्रीडा समितीच्या वतीने तालुकास्तरीय ॲथलेटिक स्पर्धेचे आयोजन तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत सेंट पॉल्स अकॅडमीच्या ईश्वरी कुलट हिने उत्तम कामगिरी करत १९ वर्षीय वयोगटातील गोळा फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर तिची जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. ईश्वरीने आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष नवनीतजी लखोटिया, उपाध्यक्ष लूनकरण डागा, सचिव प्रमोद चांडक, शारदा लखोटिया, रेखा चांडक, शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे, उपमुख्याध्यापिका ममता श्रावगी, शिक्षकवर्गातील रिंकू अग्रवाल, पर्यवेक्षक अभिजीत मेंढे, मालती महल्ले, सारिका रेळे, प्रभूदास नाथे तसेच आपल्या आई-वडिलांना दिले आहे. ईश्वरीच्या या यशामुळे सेंट पॉल्स अकॅडमीमध्ये आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/dombivleet-four-year-old-mulila-sapacha-fierce-dinner-extremor/
