India vs Pakistan Asia Cup 2025 :आशिया कप 2025 मध्ये सुपर-4 फेरी रंगतदार होणार आहे. गट ‘अ’ मधून भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ पात्र ठरले आहेत. आता पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना हायव्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे.
सामना कधी आणि कुठे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 21 सप्टेंबर, रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर सामना होईल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल. प्रेक्षक हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्क, सोनी लिव्ह ॲपवर पाहू शकतील. तर अपडेट्ससाठी टीव्ही 9 मराठी वेबसाइटवर भेट देता येईल.
🇮🇳 मागील सामन्यात भारताचा दबदबा
14 सप्टेंबर रोजी अबुधाबीमध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 7 गडी राखून भल्यामोठा विजय मिळवला होता. या पराभवाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान सज्ज आहे. मात्र, भारतीय संघ पुन्हा एकदा विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे.
रेकॉर्ड भारताच्या बाजूने
आजवर झालेल्या T20I सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी वर्चस्व राखले आहे. आतापर्यंत दोन्ही संघात 14 सामने झाले असून, त्यापैकी भारताने 11 विजय मिळवले, तर पाकिस्तानला केवळ 3 सामने जिंकता आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 5 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला धूळ चारली आहे.
हायलाईट्स :
21 सप्टेंबरला दुबईत रंगणार महामुकाबला
रात्री 8 वाजता सुरू होईल सामना
भारत-पाकमध्ये आतापर्यंत 14 सामने, त्यात भारताचे पारडे जडसूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारत पुन्हा विजयासाठी सज्ज
read also :https://ajinkyabharat.com/natyanchaya-shubhechacha-varshaw/
