नागरिकांनी घेतला मोठा लाभ

‘समाधान शिबिरा’तून शेतकऱ्यांना दिलासा

मुंडगाव  –अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथे दि. २४ सप्टेंबर रोजी महसूल मंडळांतर्गत समाधान शिबीर व फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिरादरम्यान २९ उत्पन्नाचे दाखले, ७ नॉन-क्रिमिलियर प्रमाणपत्रे, २ जातीचे दाखले, ३ रहिवासी दाखले आदींसह विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले. तर फेरफार अदालतीमध्ये २ वारस नोंदी, १ आदेश, १ बोझा, १ हक्कसोड आणि १ इतर फेरफार यासाठी दस्तऐवज प्राप्त झाले.कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात, अकोटचे नायब तहसीलदार नरेंद्र सोनवणे, पोलीस पाटील बाळकृष्ण भगेवार, ग्रा.पं. सदस्य सुरेश गवई, अरविंद फुसे, इमरान खान, पती अजिज अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी नायब तहसीलदार सोनवणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “नागरिकांनी आपल्या अडचणी थेट तलाठी किंवा महसूल अधिकाऱ्यांना कळवाव्यात. त्यावर योग्य तोडगा काढून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल,” असे ते म्हणाले.माजी पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहिभात यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. “मुंडगावमध्ये आजवर अशा प्रकारचे शिबीर झाले नव्हते. मात्र तलाठी आशेर परमार्थ यांनी गावात येऊन शेतकऱ्यांना जमिनीविषयक मार्गदर्शन केल्याने गावकऱ्यांचा विश्वास वाढला आहे,” असे त्यांनी नमूद केले.शिबिरासाठी मंडळातील अग्रवाल, बंकेवार, केळकर, परमार्थ, गावंडे, रावणकर यांच्यासह सर्व तलाठी उपस्थित होते. गावातील शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या शिबिराचा लाभ घेतला.मुंडगावातील हे शिबीर गावकऱ्यांसाठी माहिती, मार्गदर्शन व सोयी-सुविधांचा लाभ देणारे ठरले.

read also :https://ajinkyabharat.com/kajamaya-owner-ruchi-jyl-strong-entry/