गुगलचा मोठा निर्णय! क्रोमबुकवरील ‘स्टीम’ गेमिंग सेवा बंद – लाखो गेमर्सना धक्का
जगभरातील क्रोमबुक युजर्सना गुगलचा मोठा धक्का बसणार आहे.
गुगलने क्रोमबुक बीटा साठी स्टीम सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला असून, ही सेवा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच उपलब्ध राहणार आहे.
१ जानेवारी २०२६ पासून क्रोमबुकवर स्टीमद्वारे गेम खेळणे पूर्णपणे थांबणार आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
स्टीम हा पीसी गेमिंगसाठी लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे, जिथे विविध गेम डाउनलोड किंवा भाड्याने घेऊन खेळता येतात.
२०२२ मध्ये गुगलने स्टीमसोबत भागीदारी करून क्रोमबुक युजर्ससाठी याचे बीटा व्हर्जन सुरू केले होते.
या बीटा व्हर्जनमधून ९९ गेमिंग टायटल्स क्रोमबुकवर खेळण्याची सुविधा मिळत होती.
सेवा बंद का?
गुगलकडून सेवा बंद करण्यामागचं नेमकं कारण अद्याप उघड केलेलं नाही.
मात्र ९ टू ५ Google च्या अहवालानुसार, युजर्सना याबाबत अधिकृत मेसेज पाठवण्यात आला आहे.
गेमर्ससाठी पुढचा पर्याय
1 जानेवारीपासून क्रोमबुक युजर्सना गेम खेळण्यासाठी स्टीमऐवजी Google Play Store वर अवलंबून राहावं लागेल.
Play Store वरून अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरील गेम्स डाउनलोड करता येतील.
काही गेम्ससाठी पैसे मोजावे लागू शकतात, त्यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता.
थोडक्यात: गुगलच्या या निर्णयामुळे लाखो गेमर्सना आता नवा मार्ग स्वीकारावा लागणार
आहे आणि मोफत गेम खेळण्याच्या पर्यायांवर मर्यादा येऊ शकतात.
Read also :https://ajinkyabharat.com/barsheetaki-talukyat-dagdparvayat-motha-dragon-gramstandy-environment/