आंगनवाड़ी शाळा छत गळती प्रकरण
आलेगाव दिनांक ३० प्रतिनिधी चोंढी येथील अंगणवाडी पावसाच्या पाण्यामुळे, गळत असल्यामुळे
शालेय विद्यार्थ्यांना बसायला कोरडी जागा नसल्यामुळे,विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन पठण संस्काराचे धडे मिळणे दुरापास्त झाले.
या बाबत ग्रामस्थांनी पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन कळविले असता २० दिवसांचा
कालावधी उलटून संबंधित अधिकारी अथवा संबंधित प्रशासना कडून कोणतीच कारवाई करून
शाळा टीनपत्रे दुरुस्ती बाबतचे कोणतेच ठोस आश्वासन ग्रामस्थांना मिळाले नाही.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये.
व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व संबंधित प्रशासनाला जाग यावी व शाळा दुरुस्तीचे काम तात्काळ व्हावे या अनुषंगाने ग्रामस्थांनी दिनांक ३० रोजी
एकत्र येऊन ग्राम पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.जो पर्यन्त अंगणवाडी शाळा दुरुस्तीचे ठोस आश्वासन अथवा शाळा दुरुस्तीचे काम सुरू होत
नाही तो पर्यंत सदर कार्यालयाचे कुलूप बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्याचे समजले.
अंगणवाडी वरील टिन पत्रे गळती बंद करण्यासाठी नवीन टिन पत्र्याची व्यवस्था करण्याची तरतूद केली आहे.
चार पाच दिवसांमध्ये सदरहू काम केले जाईल.
रवींद्र देशमुख ग्रामसेवक चोंढी ग्रा. पं.
अंगणवाडी टिन पत्रे दुरुस्ती करीता ग्राम पंचायत स्तरावर तरतूद केली
असून नवीन टीन पत्रे टाकून गळक्या छताचे काम तात्काळ करण्याची कारवाई सुरू केलेली आहे.
विष्णू ठाकरे
ग्राम पंचायत सरपंच