इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन, ईद-ए-मिलादुन्नबी निमित्ताने रिसोड तालुक्यातील चिंचांबाभर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ५ सप्टेंबर रोजी चिंचांबाभर येथील शादी खानामध्ये झालेल्या या शिबिरात एकूण 62 रक्तदात्यांनी सहभाग घेतला.सदर शिबिराचे प्रमुख पाहुणे उपसरपंच शहाबुद्दीन, माजी मुख्याध्यापक खलील, सादिक, अहेमदनुर, शेख अफजल, शेख इलाहीनुर, शेख सलीम, अफरोज, मुजममिल, मकसुद, मुजममिल हाजी, मुस्लिम, फिरोज कुरेशी, समीर कुरेशी, मुख्तार, रिजवान, बिलाल कुरेशी व शकील उपस्थित होते.शिबिराचे आयोजन डॉ. रियाजोद्दीन, डॉ. अरबाज, डॉ. तनवीर, जुनैद कुरेशी, नुमान, शारिक, नदीम राही, मुस्तफा शाह, नियाजोद्दीन, साजिद कुरेशी, अनसार, तौसिम कुरेशी, हाफिज रिजवान कुरेशी, जहनत कुरेशी, जानी, अजहर कुरेशी, बिलाल कुरेशी, आवेज कुरेशी, आवेज बागवान, मोहसीन व ऐकता ग्रुपने केले.शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमातून स्थानिक समाजात रक्तदानाबाबत जनजागृती वाढविण्यास मदत झाली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/capus-production-cooks/