चिमुकल्यांच्या बोबड्या भाषेतून घुमला शिवरायांचा जयघोष – डोणगाव

डोणगाव

डोणगाव – छत्रपती शिवाजी महाराज जयंती डोणगाव येथील जीवन विकास कॉन्व्हेंट व कनिष्ठ महाविद्यालयमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगिनी निवेदिता बहुउद्देशीय महिला मंडळ यांच्या आयोजनाखाली झालेल्या या कार्यक्रमात शाळेचा परिसर भगव्या पताका, आकर्षक फलक आणि फुलांच्या सजावटीने नटविण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजनदीपप्रज्वलन करून करण्यात आली. विद्यार्थी विविध ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले, तर मावळ्यांच्या पोशाखातील विद्यार्थ्यांची दिमाखदार एन्ट्री उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.

पूर्व-प्राथमिक वर्गातील चिमुकल्यांनी आपल्या बोबड्या भाषेत शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा सांगून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या निरागस सादरीकरणाला पालक आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

Related News

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सिंधुताई धाडकर होत्या. उपाध्यक्ष डॉ. संगीता धाडकर यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुण्या सौ. पदमिना वाघमारे होत्या. प्राध्यापक प्रवीण अजगर यांनी शिवचरित्रातील स्वराज्य, शौर्य आणि संघटन कौशल्य यांवर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाची प्रेरणा दिली.

यावेळी केजी-२ मधील अवनीश गजानन वाघमारे याने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील कु. माया सतीश मोरे हिने केले, तर आभार प्रदर्शन कुमारी गायत्री दांदडे हिने व्यक्त केले.

प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

शिवजयंतीचा हा सोहळा विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान, देशभक्ती आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.

read also :  https://ajinkyabharat.com/akotatil-shri-kalanka-mata-mandirat-dhadsi-stolen-lakhs-of-lamps/

Related News