बालकलाकारांनी साकारले शाडू मूर्तीतून गणरायाचे रूप

शाडू

कारंजा (लाड) : कारंजा (लाड) जि.प.विद्यालय कामरगाव येथे इको क्लब आणि

स्काऊट गाईड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणपती मूर्ती

तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

ही कार्यशाळा मुख्याध्यापक प्रा. सुरेश राठोड यांच्या

मार्गदर्शनाखाली उपक्रम प्रमुख इको क्लबचे  गोपाल खाडे

आणि गाईड युनिटच्या दीपाली खोडके यांनी पाहिली.

कार्यशाळेत सुमारे १०० विद्यार्थी सहभागी झाले.

गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासंदर्भात इको क्लबचे गोपाल खाडे

व स्काऊट युनिटचे सतीश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

केंद्राचे प्रमुख कलीम , नसीर, विषयतज्ञ सचिन घुले व निरज खोरदडे यांनीही

उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांनी कल्पकतेने विविध रूपात गणरायाला साकारले.

यामुळे त्यांच्यात पर्यावरणपूरक सण साजरा करण्याची जाणीव रुजली.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे होणारे पाणी प्रदूषण, रासायनिक रंगांचे दुष्परिणाम

याबाबतही विद्यार्थ्यांनी माहिती मिळवली. निसर्गाशी एकरूप राहूनही सण साजरा करता येतो,

असा अनुभव या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना मिळाला.

read also:https://ajinkyabharat.com/ganapati-bappa-morya-marathi-celebritychya-ghari-bappache-ada-paha-special-decoration/