चिखली तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

चिखली तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच

शेतकरी दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर शेतकरी पुत्राची आत्महत्या

चिखली – ( संदीप सावळे)

तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी दांपत्य गणेश थुट्टे आणि रंजना थुट्टे यांनी हुमणी अळीने सोयाबीन पीक

उद्धवस्त झाल्याने आणि बँकांचे असलेले कर्ज यामुळे दि. २४ जुलै रोजी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

ही घटना ताजी असतानाच तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील नवयुवक शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना दि. १ ऑगस्ट रोजी घडली.

याबाबत सविस्तर वृत असे की, पिंपळगाव सराई येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र गुंड ( वय ५० वर्ष ) यांचा मुलगा

शंकर राजेंद्र गुंड ( वय २५ वर्षे ) हा नेहमीप्रमाणे दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी गाईचे दुध काढण्यासाठी गोठ्यात गेला,

दुध काढल्यानंतर त्याने दुधाचे भांडे गोठ्याच्या ठेवले आणि गोठ्याच्या आडोशाला जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.

बराच वेळ झाल्याने शंखर घरी दुध घेऊन न आल्याने त्याचे वडील त्याला पहायला गेले असता शंकर हा गळफास घेऊन लटकलेला दिसला,

त्यानंतर त्यांनी आरडाओरडा केला असता आजूबाजूचे लोक तिथे आले, त्यांना शंकरचे प्रेत लटकलेले दिसले.

Read Also : https://ajinkyabharat.com/akot-talukayati-pimpri-khurd-yethil-kelela-iran-yehet-pasti/