मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांचा रोष;

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर शेतकऱ्यांचा रोष; माती घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून अटक

अकोला :

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर विधानसभा प्रचार सभेदरम्यान महायुतीला बहुमत मिळाल्यास शेतकऱ्यांचा

सातबारा कोरा करू असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

Related News

मात्र, आजवर या आश्वासनाची पूर्तता न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा संताप :

मागील महिन्यात मुर्तिजापूर तालुक्यातील तीन तरुण शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज फेडू न शकल्यामुळे

आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या

गावातील शिवारातील माती गोळा करून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

नागपूर येथील शासकीय निवासस्थानी नेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.

पोलीसांनी केली अटक :

आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि काही शेतकरी नागपूरकडे निघाले

असताना मुर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले.

त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणखी नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांची मागणी :

शेतकरी आणि त्यांच्या संघटनांचा सरकारकडे ठाम आग्रह आहे की,

दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हलका करून आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidat-chorratyancha-devasthanavar-halla/

Related News