29 सप्टेंबरला मिळणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता

महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री– माझी लाडकी

बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९

सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत,

Related News

अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी

दिली. म्हणजेच येत्या २९ सप्टेंबर रोजी पात्र महिलांच्या खात्यावर

लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये जमा होतील. आज

मुख्यमंत्री– माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक

मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. येत्या २९ सप्टेंबर

२०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री–

माझी लाडकी बहिण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी व

क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी

कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी

35 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची

आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल, तसे सद्यस्थितीत

असणारी दरमहा 1 हजार 500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन

टप्प्याटप्प्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल,

अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना

दिली होती.

Read also:

Related News