मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानासाठी गावाची तयारी पूर्ण

ग्रामसभेत रस्त्यांना मान्यता

पळसोद:छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्‍व अभियान अंतर्गत पळसोद गावात ग्रामसभा संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिन (१७ सप्टेंबर २०२५) पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर २०२५) या कालावधीत महसुल सेवा पंधरवाडा साजरा करण्याच्या शासन निर्णयानुसार ही सभा आयोजित करण्यात आली होती.

अकोट तालुक्याचे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी वर्षा मिना यांच्या मार्गदर्शनाखाली पळसोद गावातील सरपंच विजय पाटेकर, ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामसेवक व महसूल सेवक यांचे सहकार्य घेऊन शिवार फेरीत गावातील शेत/पाणंद रस्त्यांची यादी तयार करण्यात आली. या यादीत नकाशावर असलेले तसेच नसलेले दोन्ही प्रकारचे रस्ते समाविष्ट केले गेले.

ग्रामसभेत या यादीचे वाचन करून अंतिम मान्यता देण्यात आली. तहसिलदारांनी मंजूर पांदण रस्त्यांचे भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी व सिमांकन करून रस्ते मोकळे करण्याचे आवाहन केले.

ग्रामसभेत माजी सरपंच गोकुळ भाऊ तिरख, गजानन कुयटे, राजू कुटे, बुंदे तेजराव धोत्रे, जिल्हा परिषद शाळा शिक्षक इंगळे सर, अंगणवाडी सेविका कुयटे मॅडम, अमोल बुंदे तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमाद्वारे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील पहिल्या टप्प्यातील तयारी पूर्ण झाली असून, गावासाठी आवश्यक पायाभूत कामांची दिशा स्पष्ट झाली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/29-krankin-roggarachi-sandhi/