मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक

मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक

देऊन तिरोडा-आकोट या चालत्या एसटी बसमधून वाहकाने खाली उतरून दिले

अकोट
अशी गंभीर घटना काल संध्याकाळच्या सुमारास घडली तिरोडा आगाराची बस अकोटला साडेसात आठ वाजेच्या दरम्यान पोहोचते व ती बस अकोट आगारामध्ये मुक्कामी असून पुन्हा सकाळी सात वाजता अकोट वरून तिरोडा जाण्यासाठी निघते असे दैनंदिन वेळापत्रक या बसचे आहे यादरम्यान काल संध्याकाळी पाच वाजता अमरावती आगारातून ही बस अकोट कडे निघाली असता अकोट तालुक्यातीलच वडाळी देशमुख या गावातील चार महिला प्रवासी या बस मध्ये अकोट करिता बसल्या परंतु बसमधील  वाहकाच्या तिकीट मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे तिकीट निघत नसल्याचे कारण देत पंचवटी अमरावती या ठिकाणीच या चार महिला प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देऊन जोर जबरदस्तीने खाली उतरून दिले अकोट वरून वडाळी गावात जाण्यासाठी सात वाजता नंतर ऑटो मिळत नाही महिलांना गावात पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे आम्हाला याच बसमध्ये प्रवास करणे खूप गरजेचे आहे अशा विनवण्या करून सुद्धा आर आर वाघमारे नामक वाहकाने प्रवासी महिलांचे न ऐकता तात्काळ दादागिरी करीत चार पैकी तीन महिलांना खाली उतरून दिले.
त्यामुळे या प्रवासी महिलांना दुसऱ्या बसला खूप उशीर होत असल्यामुळे अमरावती शहरातच रात्र काढावी लागली त्यावेळी हा सर्व घटनाक्रम परिचित असलेल्या अकोट येथील समाजसेविका चंचल पितांबरवाले यांना रात्री अकरा वाजता या महिलांनी सांगितला त्यानंतर तात्काळ पितांबरवाले यांनी दोन्हीही आगाराच्या मॅनेजरला हा सर्व प्रकार कळवला आणि या अन्यायग्रस्त महिलांना न्याय देण्यासाठी आज सकाळीच पाच वाजता पत्रकार रविराज मोरे सह अकोट बस स्टॅन्ड गाठून वाहकाला वेगळ्या स्टाईलने महाप्रसाद दिला व महिलांना अकोट आगारामध्ये तक्रार देण्यासाठी प्रोत्साहन दिले यादरम्यान रविराज मोरे हे आर आर वाघमारे नामक वाहकाची झालेल्या घटनेची व्हिडिओ प्रतिक्रिया घेत असताना वाहकाकडून व्हिडिओ बंद करण्यासाठी पुन्हा अति हुशारी करण्यात आली परंतु मोरे यांनी वाहकाला डिपार्टमेंटच्या नियमांचा चांगलाच डोज पाजल्यामुळे वाहकाला प्रतिक्रिया पूर्ण करावी लागली तिकीट मशीन बिघडल्यास जुने साधे कागदी तिकीट फाडून प्रवाशांना देण्याची मुभा आहे.प्रत्येक वाहकाने जुने कागदी तिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे मशीन मध्ये बिघाड झाल्यास यामध्ये प्रवाशाचा कोणताही दोष नसून हा सर्व एस टी महामंडळ चा भोंगळ कारभार आहे याचाच फटका काल महिला प्रवाशांना बसला आहे.वाहकाकडे कागदी तिकीट उपलब्ध असून सुद्धा कागदी तिकीट कसे फाडायचे याची माहिती नसल्यामुळे हा सर्व प्रकार वाहक व महामंडळ यांच्या गलथान कारभारामुळे झाला.
या सर्व घडामोडी मुळे तिरोडा व अकोट आगार यांनी हे प्रकरण गंभीर घेतले असून वाहक आर.आर.वाघमारे यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याची माहिती आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीणच सुरक्षित नसून चालत्या बस मधून कोणताही दोष नसताना अपमान कारक वागणूक देऊन उतरून दिल्या जाते हीच या सरकारची अयशस्वी उपलब्धता आहे.अशा मुजोर वाहकाला तात्काळ निलंबित करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्या अन्यायग्रस्त लाडक्या बहिणीकडून केल्या जात आहे.

मला रात्री अकरा वाजता अचानक मुक्ता प्रवीण शिंगाडे,आशाबाई गजानन झास्कर,भुलाबाई दिलीप दहातोंडे,मुक्ताबाई झास्कर,रा.वडाळी देशमुख यांच्याकडून तिरोडा -आकोट या बसमधून अमरावती पंचवटी या ठिकाणी उतरून दिल्याची माहिती मिळाली.त्यामुळे मी तात्काळ दोन्ही आगाराच्या मॅनेजरला संपर्क करून हा गंभीर प्रकार सांगितला असता तात्काळ वाहक आर आर वाघमारे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मिळाले त्या अनुषंगाने मी स्वतः सकाळीच पाच वाजता अकोट एसटी बस स्टँड ला जाऊन वाहकाला माझ्या स्टाईलने समज दिली व सर्व अन्यायग्रस्त भगिनींना तक्रार देण्यासाठी प्रोत्साहन दिले.तसेच यापुढे कोणत्याही प्रवाशाला बस मधून उतरून देण्यात येऊ नये.अन्यथा याचे परिणाम वाईट होतील अशी ताकीद सुद्धा मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.
कु.चंचल पितांबरवाले
सामाजिक कार्यकर्त्या अकोट.

Related News

तिकीट मशीन बंद पडल्यास त्याला पर्याय म्हणून साधे कागदी तिकीट वाहकाकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे.साधे तिकीट फाडण्याची प्रक्रिया वाहकला समजत नसेल तर ही फार मोठी गंभीर चूक आहे या सर्व प्रकाराची माहिती योग्य कार्यवाही करिता तिरोडा आगाराला पाठवण्यात येईल.

अरविंद पिसोडे
आगार व्यवस्थापक अकोट.

Related News