मुख्यमंत्री फडणवीस यवतमाळमध्ये

दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार

यवतमाळ: एकात्म मानव दर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांपासून प्रेरणा घेऊन कार्यरत दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या दीनदयाल जयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस सोमवार, दिनांक २९ सप्टेंबर रोजी यवतमाळात येत आहेत. सकाळी 11 वाजता जांब रोडवरील बोरी- तुळजापूर महामार्गालगतच्या हॉटेल दि वेनेशियन लाॅनवर आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड, राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके व माजी मंत्री मदन येरावार प्रामुख्याने उपस्थित राहतील.तत्पूर्वी मुख्यमंत्री निळोणा येथील दीनदयाल प्रबोधिनीला भेट देऊन या ठिकाणी संस्थेतर्फे चालणारे सेंद्रिय शेतीतील प्रयोग समजून घेतील. प्रबोधिनी परिसरातील गोशाळा व दुर्मिळ देशी बियाणांच्या प्रदर्शनीचे भेट देतील. त्यानंतर जांब मार्गावरील पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानात उभारलेल्या भव्य पुतळ्याचे अवलोकन करून अभिवादन करतील.  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील द वेनेशियन लाॅन येथे सोमवारी, 29 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता आयोजित जाहीर कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन दीनदयाल सेवा प्रतिष्ठाने केले आहे.

वाहनतळ व्यवस्था : या कार्यक्रमास यवतमाळ शहर व बाभुळगाव तालुक्यातील येणाऱ्या नागरिक बंधू भगिनींसाठी जांब मार्गावरील वन उद्यान परिसरात वाहनतळाची व्यवस्था केली आहे. या ठिकाणाहून ज्येष्ठ नागरिकांसाठी सभास्थळी जाण्याकरता निःशुल्क ऑटो रिक्षा उपलब्ध राहतील.
उर्वरित तालुक्यांतील नागरिक बंधू भगिनींसाठी बोरी- तुळजापूर हायवेवरील वेनेशियन जवळच्याच हिल टॉप लाॅनवर वाहनतळ व्यवस्था केली आहे.

read also:https://ajinkyabharat.com/mental-coffee-rahu-shakato/