मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत 4 महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळाचे मुख्य निर्णय:
ऊर्जा विभाग: उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीस मुदतवाढ देण्याचा निर्णय. मार्च 2027 पर्यंत अतिउच्चदाब, उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व 1,789 योजनांवर शेतकऱ्यांना वीज दरात सवलत मिळणार.
नगरविकास विभाग: नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून 2,000 कोटी रुपयांचे कर्ज उभारणीस मान्यता. यामध्ये:
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 822 कोटी रुपये
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चार मलनिस्सारण प्रकल्पांसाठी 268 कोटी रुपये
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 116 कोटी रुपये
मृद व जलसंधारण विभाग: अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी (ता. मुर्तिजापूर) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता. यामुळे मुर्तिजापूर तालुक्यात सिंचन क्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांना फायदा होणार.
महसूल विभाग: रायगड जिल्ह्यातील मौजे आसुडगाव (ता. पनवेल) येथील शासकीय गायरानातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या सब्सिडरी इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या रहिवास क्वार्टर्ससाठी देण्यास मान्यता.
या निर्णयांमुळे शेतकरी, नागरी प्रकल्प आणि सुरक्षा विभागाला मोठा फायदा होणार आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/60-thousand-shetkyanna-benefits-are-not-mined-by-rohit-pavrancha-charges/
