मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश

त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांवर हल्ला

त्र्यंबकेश्वर : नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर गंभीर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानीजवळ गाड्यांच्या प्रवेशाची पावती न मिळाल्यामुळे वाद उभा राहिला आणि त्यातून या हल्ल्याची घटना घडली.घटनेत तीन ते चार पत्रकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.मुख्यमंत्री दी. फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जखमी पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि मारहाण करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. भुजबळ म्हणाले,
“मी एसपिंडांसोबत फोन केला ताबडतोब आणि त्यांना सांगितलं की कारवाई करा. पुन्हा सांगतोय की कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे, टाइम पास होता कामा नये.”

read also : https://ajinkyabharat.com/shakado-drone-theate-lakshwar/