लोणार प्रतिनिधी:-//
लोणार तालुक्यातील बीबी येथे २२ जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त
गोपाल काबरा यांच्या संकल्पनेतून २०१ विविध जातीच्या वड, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ, चिंच,
आंबा, अशा नामवंत वृक्षांची लागवड करण्यात आली.
गोपाल काबरा यांनी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी शाळा,
कॉलेज, मंदिर, स्मशानभूमी अशा सार्वजनिक ठिकाणी २०१ वृक्षांची भारतीय जनता पार्टीचे
सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, ग्रामस्थ, मान्यवरांच्या उपस्थितीत लागवड करण्यात आली.
गोपाल काबरा यांनी
२०१ वृक्ष लावले. मात्र त्याचे संगोपनाचीही जबाबदारी ही त्यांनी स्वीकारली असल्यामुळे झाडे जगणार असून,
अनेकांना सावली देतील. अशा या उपक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
यावेळी भाजपा कार्यकर्ते, मान्यवर, ग्रामस्थ, तरुण मंडळी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.