मुंबई :
मराठा साम्राज्याचा पराक्रमी योद्धा छत्रपती संभाजी महाराज यांचं शौर्य ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून
रूपेरी पडद्यावर प्रकट झालं आणि प्रेक्षकांनीही या गाथेला उचलून धरलं! विक्की कौशल अभिनीत ‘छावा’
Related News
अकोला जिल्हा परिषदेच्या इमारतीला आग;
पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवेवर भीषण अपघात टळला!
उत्तर प्रदेशातील शिक्षण मंदिरात बालमजुरी!
UPSC निकालात महाराष्ट्रात पहिलाच!
वन्य प्राण्यांचा हैदोस! ३ हेक्टरवरची उन्हाळी मुग केली उद्ध्वस्त;
महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ८ महत्त्वाचे निर्णय;
त्र्यंबकेश्वरमध्ये साधूवेषातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू
Beed Crime | ‘आका’ जेलमध्ये, तरीही जिल्ह्यात दहशत कायम;
उद्धव ठाकरे यांच्यावर आशिष शेलार यांचा घणाघात;
वाहतूक नियमांसाठी गाण्यांचा आधार!
“संदूक उघडलं आणि…” विवाहित प्रेयसीच्या घरी अर्धनग्न अवस्थेत लपलेला प्रियकर;
१० कोटींची खंडणी मागितली
नं 66 दिवसांत तब्बल ₹600.10 कोटींची ऐतिहासिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे,
11 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर ओटीटी रिलीज झाल्यानंतरही या चित्रपटाचं थिएटरमधलं यश अविरत सुरू आहे.
‘OTT’वर आल्यावरही थांबला नाही ‘छावा’चा धडाका
सामान्यतः एखादा चित्रपट ओटीटीवर आला की, थिएटरमधील गर्दी ओस पडते.
पण लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ची कथा काही वेगळीच ठरली. ओटीटीवर स्ट्रीमिंग सुरू झाल्यानंतरही प्रेक्षक
चित्रपटगृहात जाऊन ही ऐतिहासिक गाथा अनुभवण्यास उत्सुक आहेत.
चित्रपटाने 600 कोटींचा टप्पा पार करत बॉक्स ऑफिसवर झेंडा रोवला आहे.
‘छावा’नं केला तिसऱ्या क्रमांकावर झेप!
‘छावा’ हा बॉक्स ऑफिसवर ₹600 कोटींचा आकडा पार करणारा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे.
याआधी ‘पुष्पा 2’ आणि ‘स्त्री 2’ ह्या चित्रपटांनी ही कामगिरी केली होती. ‘छावा’नं यशाच्या या यादीत भर टाकत आपलं स्थान भक्कम केलं आहे.
शौर्य, संगीत आणि अभिनयाची त्रिसूत्री
-
विक्की कौशल यांच्यासह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेंटी यांचं दमदार अभिनय,
-
ए. आर. रहमान यांचं प्रेरणादायी संगीत,
-
आणि छत्रपती संभाजी महाराज यांची रोमांचक गाथा — या तिन्ही घटकांनी प्रेक्षकांच्या मनात ‘छावा’ला अढळ स्थान मिळवून दिलं आहे.
जगभरातून मिळतंय प्रेम; ग्लोबल रँकिंगमध्ये झेप
नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर, इंग्रजी नसलेल्या चित्रपटांमध्ये ‘छावा’नं जागतिक स्तरावर पाचवं स्थान पटकावलं आहे.
हे स्थान मिळवणं ही केवळ मराठी इतिहासासाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीसाठीही अभिमानास्पद गोष्ट आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/trimbakeshwamadhya-sage/