अकोला :
लातूरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अजित
पवार गटाचे पदाधिकारी सुरज चव्हाण आणि त्याच्यासोबतच्या गुंडांनी हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या घटनेनंतर अकोला जिल्ह्यातील छावा संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले असून,
दोषींवर कठोरात कठोर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी करावी,
अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनाद्वारे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय गाडगे पाटील यांनी लातूर येथे केलेल्या वक्तव्यानंतर सुरज
चव्हाणने हिंसक मार्ग अवलंबल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय छावा संघटना, अकोला जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील आणि जिल्हाध्यक्ष रणजित काळे
यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. हल्लेखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा,
अन्यथा छावा कार्यकर्ते राज्यव्यापी आंदोलन छेडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
Read Also : https://ajinkyabharat.com/policanchi-muthi-action-five-accused-attake-under-operation-prahar/