छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

मालवणमधील

मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा

पुतळा कोसळल्याची घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा

कोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी

Related News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण करण्यात आले होते.

निकृष्ट बांधकामामुळे हा शिवरायांचा पुतळा कोसळ्याचाा आरोप

शिवप्रेमी करत आहेत.येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी

सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थेसाठी

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या

कार्यालयाकडून सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

राज्य सरकार आणि नौदल विभागाने निर्णय घेतल्यानंतरच राजकोट येथे

पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले होते.

राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 35 फूटांचा होता.

मालवणमधील तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते.

Read also: https://ajinkyabharat.com/indication-of-heavy-rain-in-many-states-of-the-country/

Related News