बार्शीटाकळी प्रतिनिधी
जिल्ह्यातील मॉडेल व्हिलेज चेलका येथे शेतकऱ्यांना तालुका कृषी अधिकारी सौ.संध्या करवा यांनी ट्रायकोडर्मा,
सुक्ष्म अन्नद्रव्ये शेताच्या बांधावर जाऊन वाटप केले.चेलका गावात स्वतः
कृषी अधिकारी येऊन निविष्ठा वाटप करतात हे येथील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच पाहिलं असे येथील शेतकरी सांगतात.
सोयाबीन,तुर, कपाशीसाठी उपयुक्त असलेले बुरशीनाशक, सुक्ष्म अन्नद्रव्ये वाटप करण्यात आले.
नंतर कृषी विद्यापीठाने चेलका येथे दिलेल्या पर्जन्यमापक यंत्राद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्या कडुन पडलेल्या पावसाचे मोजमाप करण्यात आले.
या कार्यक्रमाला संध्या करवा तालुका कृषी अधिकारी,अविनाश मेश्राम मंडळ अधिकारी,
संघपाल वाहुरवाघ पानी फाउंडेशन,रवि बजर कृषी सहायक उपस्थित होते.
गावातील शेतकऱ्यांना कृषी विभाग, आत्मा विभाग, कृषी विद्यापीठ अकोला,पानी फाउंडेशन नेहमी सहकार्य करुन
कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल या उद्देशाने वेगवेगळे प्रयोग करीत असतात.
याच उद्देशाने गावात नैसर्गिक शेतकरी गट,स्मार्ट कॉटन गट स्थापन करण्यात आले तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून याच
नैसर्गिक गटाला जुनमध्ये खरीप साठी सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले.गावाच्या विकासासाठी रामेश्वर पाटील विविध नविन
योजना पाठपुरावा करून गावात खेचुन आणतात. फळबाग लागवड,केळी लागवड,मधुमक्षिका पालन,नैसर्गिक शेती,
स्मार्ट कॉटन,दुग्धव्यवसाय,शेळी पालन,कुक्कुटपालन व्यवसाय साठी केव्हिके अकोला येथेअ प्रशिक्षण अशा विविध योजना गावात सुरु आहेत.
कृषी दिनाच्या निमित्ताने जिल्हा कृषी अधीक्षक श्री.शंकरराव किरवे, प्रकल्प संचालक आत्मा डॉ.मुरलीधर इंगळे
डॉ.प्रकाश घाटोळ, डॉ अरविंद तुपे हवामान शास्त्रज्ञ पिडिकेव्ही अकोला सदिच्छा येऊन रामेश्वर पाटील यांना १२ एप्रिल रोजी
हैद्राबाद येथे आयसीएआर च्या ४१ व्या स्थापना दिनानिमित्त सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण राष्ट्रीय शेतकरी पुरस्कार २०२५ सपत्नीक प्रदान करण्यात आला होता.
अतिशय दुर्गम भागात असलेल्या गावाची ओळख जिल्ह्यात आता होत आहे.चंद्रशेखर उंडाळ,विजय उंडाळ,
समाधान इंगळे,संदीप उंडाळ,नितेश उंडाळ, प्रमोद अरबाड,चेतन अरबाड,रामा उंडाळ उपस्थित होते.
Read Also : https://ajinkyabharat.com/maratha-seva-mandalacha-tree-plantation-program-concluded/