अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील फिर्यादी संदिप रामदास बदरखे यांनी आरोपी जगदिश अशोकराव मोंढे रा.केळीवेळी ता.आकोट जि.आकोला
यांना सन २०२२-२३ मध्ये कापुस विकला होता.सदर कापसाची रक्कमेची परतफेड करण्याकरीता जगदिश अशोकराव
मोंढे यांनी दि.२४/०९/२०२३ रोजीचा धनादेश रक्कम रू.१०.५२,४४७ रूपयांचा दिला होता.सदर धनादेश फिर्यादि संदिप रामदास
बदरखे यांनी वटविण्याकरीता दि.१२/१२/२०२३ रोजी बँकेत लावला असता सदर धनादेश हा आरोपी जगदिश अशोकराव मोंढे यांचे खात्यात
अपुरी रक्कम असल्याचे सबबीवर अनादरीत झाला.म्हणुन फिर्यादी संदिप रामदास बदरखे यांनी सदर धनादेशाची रक्कम मागणी करणारी
नोटीस दि.२६/१२/२०२३ रोजी दिली सदर नोटीस प्राप्त होवुनही आरोपी जगदिश अशोकराव मोंढे यांनी धनादेशाची रक्कम मुदतीचे
आत न दिल्याने फिर्यादी संदिप रामदास बदरखे यांनी वि.न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आकोट यांचे न्यायालयात
संक्षिप्त.फौ.मु.नं. १३९/२०२४ हे प्रकरण कलग १३८ एन.आय.अॅक्ट प्रमाणे दाखल केले.सदर प्रकरणात वि.न्यायालयाने फिर्यादी
संदिप रामदास बदरखे यांनी दिलेली साक्ष व पुरावे ग्राहय धरून वि.न्यायालयाने दि.०८/०७/२०२५ रोजी न्यायनिर्णय पारीत केला
असुन फिर्यादी संदिप रामदास बदरखे यांची फिर्याद मंजुर करून आरोपी जगदिश अशोकराव मोंढे यांना कला १३८ एन.आय.अॅक्ट गुन्हयात दोषी
ठरवुन सहा महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा तसेच रक्कम रू.१३,००,०००/- नुकसान भरपाई ३० दिवसांचे आत देण्याचे आदेशीत केले आहे.
तसेच सदर रक्कम ३० दिवसांत न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावासाचा आदेश पारीत केला आहे.
सदरहु प्रकरणामध्ये फिर्यादीतर्फे अॅड.प्रविण.देविदास वानखडे यांनी कामकाज पाहले.
Read Also : https://ajinkyabharat.com/kokanat-musadhar-pavasacha-hhaar/