जळगाव :चाळीसगाव शहरात भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी
यांच्यावर सोमवारी रात्री कोयत्याने प्राणघातक हल्ला झाला.
वैष्णवी साडी सेंटरजवळ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून वार केले.
गंभीर जखमी अवस्थेत चौधरी यांना तातडीने धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते चौधरी यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले होते.
त्यानंतरच झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करून शहरासह परिसरात पाठविण्यात आली आहेत.
हा हल्ला राजकीय वादातून झाला की वैयक्तिक कारणातून, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हाभरात खळबळ
प्रभाकर चौधरी हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते मानले जातात.
त्यांच्या वर झालेल्या हल्ल्यामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
भाजप जिल्हा संघटनेकडून या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
पूर्वीही हल्ल्यांची मालिका
चाळीसगावमध्ये यापूर्वीही माजी नगरसेवकांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत.
फेब्रुवारी 2024 मध्ये माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावरही अज्ञात तरुणांनी गोळीबार केला होता.
त्यानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने चाळीसगावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/newly-constructed-ganeshotsav-mandal-baza/